भारत देशाचे पहिले शिक्षण मंत्री अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीला संपूर्ण भारतभरात नॅशनल एज्युकेशन डे साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून जळगाव शहरातील सामाजिक, राजकीय,क्रीडा शैक्षणिक, क्षेत्रातील कार्यरत अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांनी माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या माध्यमाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक त्यांना *उर्दू घर* स्थापनेबाबत निवेदन दिले आहे.
उर्दू घर व त्याचे उद्देश
महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येक जिल्ह्यात *उर्दू घर* स्थापनेची शासकीय आदेश पारित झाले असून महाराष्ट्रात नांदेड ,सोलापूर, औरंगाबाद, मुंबई या ठिकाणी *उर्दू घर* स्थापन झालेले आहे त्याच धर्तीवर जळगावला सुद्धा उर्दू घराची स्थापना करावी अशी मागणी पुढे आलेली आहे.
उर्दू घर स्थापन झाल्यास अल्पसंख्यांक समाजासाठी उर्दू व मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होऊन दोन्ही भाषांमधील लेखक आणि कवी ,विद्वान आणि संशोधकांसाठी व्यासपीठ मिळेल त्याचप्रमाणे उर्दू लेखक आणि साहित्य व्यक्तीसाठी मराठी आणि उर्दू भाषा आणि संस्कृती या दोन समुदायांमध्ये दुवा म्हणून ते कार्य होईल तसेच उर्दू घरा मध्ये मुशायरे, कविसंमेलन त्याचप्रमाणे फिजिकल व ऑनलाईन लायब्ररी, रीडींग रूम, स्पर्धा परिक्षांचे प्रशिक्षण, कलाकारांसाठी ग्रीन रूम, सर्टिफिकेट कोर्स ,सॅटॅलाइट कोर्स व फॅकल्टी कोर्स चे नियोजन करता येईल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे उर्दू घरा मुळे सेंट्रल हॉल निर्माण होऊन त्या माध्यमाने तीनशे ते चारशे लोक एका ठिकाणी बसून आपल्या आचार विचारांचे आदान-प्रदान होतील व त्यामुळे सलोख्याचे संबंध निर्माण होइल व अल्पसंख्यांक समाज हा विकासाकडे जाईल या उद्दिष्टपूर्तीसाठी उर्दू घराची स्थापना होणे आवश्यक असल्याचे या शिष्टमंडळाने आपल्या निवेदनात नमूद केलेले आहे.
शिष्टमंडळात यांचा होता सहभाग
मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख, उर्दू विभाग प्रमुख डॉक्टर प्रोफेसर एम इकबाल,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मझहर पठाण, एम आय एम जिल्हाध्यक्ष शेख अहमद हुसेन, समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष मोहिनुद्दीन शेख इक्बाल ,शिवसेना उप महानगरप्रमुख रईस शेख, एम आय महानगरप्रमुख दानिश अहेमद, काँग्रेस आईचे महानगर अध्यक्ष नदीम काझी , राष्ट्रवादीचे प्रसिद्धी प्रमुख सलीम इनामदार ,मुस्लिम महिला सेवा संघाच्या अध्यक्ष फिरोजा शेख, मुस्लिम महिला सेवा संघाच्या महासचिव सौ नसरून फातेमा, शिकलगार बिरादरीचे संचालक अन्वर खान, काकर बिरादरीचे जिल्हाध्यक्ष रियाज वजीर, काट्या फाईल मित्रमंडळाचे फारूक अहेलेकार, जामा मसजीद ट्रस्टचे सय्यद चांद, हुसेनी सेना चे जिल्हाध्यक्ष फिरोज शेख, उर्दू इलेक्ट्रॉनिक मीडियाचे हाफिज अब्दुल रहीम, उर्दू टाइम्स चे पत्रकार सईद पटेल आदींची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन उपजिल्हाधिकारी महसुल शुभांगी भारदे यांना निवेदन देताना फिरोजा शेख, नसूरुन फातेमा, फारुक शेख, मोयोनोद्दीन शेख, रईस शेख, अहमद शेख आदि दिसत आहे